लेखा-कोष दिन
लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना दिनांक 1 जानेवारी 1962 रोजी करण्यात आली. शासनाने
, 1 फेब्रुवारी1965 पासून , महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली.
तेव्हापासून दरवर्षी हा दिवस लेखा-कोष दिन म्हणून साजरा करण्यात येतो.परभणी कोषागार कार्यालय मार्फत "०१ फेब्रु २०१३ लेखा-कोष दिवस" विविध कार्यक्रम घेवून सर्व कोषागार कर्मचा-याच्या सहकार्याने उत्साहात पार पडला .यावेळी खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यालयातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. DCPS बाबतीत कार्याबाबत श्री. दत्ता भांगे, अप्पर कोषागार अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र लेखां लिपिक परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री. ओपलिकर आणि श्री. भानुसे यांचा तसेच श्री कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याबद्दल श्री कांकरिया यांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सचिन धस,वरिष्ठ लेखाधिकारी, DRDA यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अभय चौधरी, जिल्हा कोषागार अधिकारी यांनी लेखा-सेवा विषयक समयोचित मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम, कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सांभाळून आयोजित करण्यात आला.
लेखा-कोश दिन आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.गरुड (आस्थापना शाखा) यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.