बील पोर्टल प्रणालीद्वारे खर्चाची देयके तयार करणेबाबत
सध्या कोषाागार कार्यालयात सादर होणारे विविध प्रकारची देयके उदा. दुरध्वनी, पाणी, विद्युत , प्रवास भत्ता, वैद्यकीय प्रतिपुर्ती, आकस्मिक खर्च इत्यादी संबंधातील देयके हस्तलिखित स्वरुपात तयार करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून सादर केली जातात. त्याऐवजी प्रत्येक प्रकारच्या देयकांचे नमुने बील पोर्टल या संगणक प्रणालीवर तयार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या आहरण व संवितरण अधिका-यांसाठी तयार केली आहे. वेतन देयकांव्यतिरिक्त इतर देयके सदर प्रणालीद्वारे तयार करावयाची आहेत. त्यासाठी आवश्यक तपशील आहरण व संवितरण अधिका-याच्या प्रतिनिधीने नोंदवायचा आहे. नोंदविलेल्या तपशीलाची पडताळणी प्रणालीद्वारे करण्यात येते तसेच अचूक तपशील नोंदविण्यासाठी आवश्यक नियम प्रणालीमध्ये नोंदविण्यात आले आहे. आहरण व संवितरण अधिका-याने प्राधिकृत केलेल्या मागणीचे प्रणालीद्वारे देयक तयार होईल.
उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत खर्च करण्यासाठी बील पोर्टल अर्थसंकल्प वितरण प्रणालीशी जोडण्यात येईल. प्रणालीमध्ये समाविष्ट केलेले देयकांचे नमुने हे महालेखाकार कार्यालयाच्या निर्देशांनुसार व मान्यतेने समाविष्ट केले आहेत. अनुदानाच्या खर्चास परवानगी व बार कोड हे देयकामध्ये समाविष्ट असल्यामुळे तयार होणा-या देयकास “देयक तथा प्राधिकारपत्र” असेही संबोधू शकतो. आहरण व संवितरण अधिका-याने देयक तयार करण्यासाठी नोंदविलेला तपशील Treasury Net प्रणालीमध्ये देयक तपासणी करताना उपलब्ध होईल. त्याचबरोबर सदर प्रणालीवर विविध उपलब्ध माहिती अहवाल भविष्यात निर्णय घेण्यास उपयुक्त होतील.
प्रत्येक बिल 5 parts- खालील विभागली आहे 1 ) लेखा माहिती 2)मुख्य बिल भाग 3)DDO यांनी ज्याला पैसे दिले तो Payee तपशील आणि प्रमाणन 4)कोषागार कामकाजासाठी जागा 5)महालेखाकार कार्यालय़ कामकाजासाठी जागा. तयार होणारा तपशील या पोर्टलवर कायमस्वरुपी साठवुन ठेवण्यात येणार आहे.
माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
powerpoint presentation
electricity manual
telephone manual
water claim manual
अधिक माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय परभणी येथे संपर्क करा .
काही शंका असल्यास मेल करा @ devteam.billportal@mahakosh.org.in

No comments:
Post a Comment