NPS करीता डीडीओ रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त होण्यासाठी सेवार्थ प्रणालीतील डीडीओ प्रोफाईल अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे.
सहाय्यकाच्या लॉगीनमधून डीडीओ प्रोफाईल मधील डीडीओ ऑफीस मधील माहिती खालील Path नुसार अद्ययावत करावी.
1.
Worklist > Payroll > DDO Profile > DDO Office in DDO Asst. login.
उपरोक्त Path मध्ये खालील तपशीलात माहिती भरावी.
Name of the office
DDO Y/N
District , Taluka, Town , Village, Address Line1 (30 शब्दांपर्यंत मर्यादित), Address Line 2 , Address Line 3 , PIN
Office City Class
Telephone number 1 (Landline) - एसटीडी कोड स्वतंत्र व मुख्य क्रमांक स्वतंत्र पध्दतीने भरावा. (उदा. 022- 23456789)
Official Email id
तसेच सदर कार्यालय कोणत्या परिक्षेत्रात येते (Tribal, Hilly ,Naxalite Area- अचूक माहितीनुसार Yes/No या टॅबवर क्लिक करावे.)
उपरोक्त माहिती अद्ययावत करुन SAVE या टॅबवर क्लिक करावे.
शक्यतो
फक्त Main office मधील माहिती अद्ययावत करावी परंतु जर एखाद्या आहरण व
संवितरण अधिकाऱ्याने यापूर्वीच Main office व Sub Office तयार केलेली असतील
तर दोन्ही Office ची माहिती अद्ययावत करावी अन्यथा देयके जनरेट होणार
नाहीत. परंतु जर Sub Office यापूर्वीच तयार केलेले नसेल तर आता पुन्हा तयार
करु नये.
2.
तसेच दुसरी महत्त्वाची Activity म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बँकांचे Address व Pin Code अद्ययावत करणे.
यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या लॉगीनमध्ये खालील Path नुसार माहिती अद्ययावत करावी.
Worklist > DCPS > Data Updation for NPS System > Update Bank Details for S1
प्रथम
बँकेचे नाव सिलेक्ट करावे त्यानंतर स्क्रीनवर सदर बँकेच्या सेवार्थमध्ये
समाविष्ट असलेल्या ब्रँचची नावे दिसतील, त्यानुसार डीसीपीएस कर्मचाऱ्यांचे
ज्या बँकेमध्ये खाते आहेत त्या बँकेच्या ब्रँचची माहिती अद्ययावत करावयाची
आहे. ब्रँच समोर यापूर्वी प्रणालीमध्ये असलेला Address दिसेल, त्यानंतर
बाजूलाच दिलेल्या मोकळ्या रकान्यात 50 शब्दामध्येच अचूक पत्ता अद्ययावत
करावा व पिन कोड दिलेल्या मोकळ्या रकान्यात भरावा.
जर
तुमची ब्रँच अपडेट करण्यासाठी दिसली नाही तर याचा अर्थ असा होतो की, सदर
बँकेचे अपडेशन यापूर्वीच एखाद्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात
आलेले आहे. त्यामुळे गोंधळून न जाण्याबाबत सर्व आहरण व संवितरण
अधिकाऱ्यांना सूचित करावे.
प्रथमत:
DDO office details व त्यानंतरच Bank Details Update करावयाचे आहे. डीडीओ
डिटेल्स अपडेट केल्याशिवाय मासिक वेतन देयके जनरेट होणार नाहीत याची नोंद
घेण्याबाबत सर्वांना सूचित करावे.