Tuesday, 15 May 2018

सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्याबाबत असलेली अनियमितता व कर्मचारी यादी


सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की,
वर्ष 2007-08 ते 2011-12 पर्यंत काही  डिसीपीएस कर्मचा-यांच्या आर-3 विवरणपत्रात अखेरची शिल्लक व सुरुवातीची शिल्लक निरंक असणे,  सुरुवातीच्या  शिल्लकेवरील व्याज निरंक असणे इ. त्रुटी असलेली 6160 प्रकरणे असल्याचे मे. टिसीएस यांनी निदर्शनास आणले आहे. सदरची यादी मे. टिसीएस कडून प्राप्त झाली असून ती या सोबत  पडताळणीसाठी आपणास पाठविण्यात येत आहे.
          सदर यादीतील आपल्या कार्यालयाशी संबंधित डिसीपीएस कर्मचा-यांच्या अंशदानाची माहिती आर-2 वरून पडताळणी करावी व बरोबर असल्याची खात्री करून तसे प्रमाणित करावे व तसे प्रमाणपत्र कोषागारास सादर करावे. त्रुटी अथवा तफावत आढळून आल्यास योग्य दुरुस्तीसह  व योग्य पुराव्यासह (आर 2)कर्मचा-यांचा अहवाल या कार्यालयास दि. 11.05.2018 पर्यंत खात्रीशीर पाठविण्यात यावा. सदरील कोणताच अहवाल न पाठवल्यास सदरील माहिती  बरोबर आहे असे ग्रहीत धरून टिसीएस यांना कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी.
      सदरील कार्यवाही कालमर्यादीत असल्यामुळे अतितात्काळ स्वरूपात करण्यात यावी ही विनंती.
जिल्हा कोषागार अधिकारी परभणी
सदरील पत्रासोबत एकुण 7 pdf  जोडल्या असून त्या खालील प्रमाणे तपासण्यात याव्यात.
1.      काही कर्मचा-यांच्या 6 व्या वेतन आयोगाच्या दोन हप्त्यामध्ये फरक आहे तर तो योग्य अथवा अयोग्य आहे त्याची खात्री करावी.
2.      काही कर्मचा-यांचे हप्तयामध्ये तफावत आहे ते तपासून खात्री करावी.
3.      डिसीपीएस कर्मचा-यांचे 6 व्या वेतन आयोगाचे installments दिलेले आहेत जे कोषागाराने पारित केलेले आहेत ते तपासून खात्री करावी.
4.    तसेच zero opening balance असलेल्या काही कर्मचा-यांची यादी जोडली  आहे तर ती बरोबर आहे अथवा नाही हयाची खात्री करावी. जर त्यात त्रुटी असेल तर कोषागारास आर 2 सह सादर करावे.
           (4,5,6 व 7)
त्रुटी असल्यास पुराव्यासह व त्रुटी नसेल तर बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करावे.

                                                                                                     जिल्हा कोषागार अधिकारी परभणी
employee list of 6th pay installments discrepencies. click here