आवाहन
सर्व निवृत्ती वेतन धारकांना तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आवाहन करण्यात येते कि , नोव्हेंबर
महिन्याचे वेतन घेताना हयातीचे / पुनर्विवाह/ पुनर्नियुक्ती बाबत
प्रमाणपत्र बँक अधिकाऱ्याचा सहीनिशी अथवा राजपत्रित अधिकाऱ्याचा सहीनिशी
सदर करावे.अन्यथा आपले माहे डिसेंबर चे निवृत्ती वेतन रोखण्यात येईल.सर्व
कुटुंब निवृत्ती वेतन धारक व पुनर्नियुक्त निवृत्तीवेतनधारक यांनी सदर प्रमाणपत्रातील पुनर्विवाह/ पुनर्नियुक्तीचा तपशील भरल्याशिवाय त्यांचे निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.विहित नमुन्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : http://www.mahakosh.in/images/stories/pension/life_certificate.pdf
हयातीच्या दाखल्यांची एकत्रित विवरणे प्रत्येक बँकेस /शाखेस पाठविण्यात आली आहेत . म्हणजे दि १ नोव्हेंबर १२ पासून निवृतीवेतन बँकेत घ्यायला आलेला निवृतीवेतान्धारक त्यावर बँक अधिकार्यासमोर सही करेल .परभणी कोषागार कार्यालयात सुद्धा १ नोव्हेंबर पासून हयातीचे
दाखले स्वीकारण्यासाठी एक कर्मचारी नेमून counter /खिडकी उघडण्यात आली आहे .पुनर्विवाह /पुनर्नियुक्त नि वे करिता
स्वतंत्र विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेण्याच्या सूचना बँकेस देण्यात आल्या आहेत .
दि १८/८/२००८ च्या शासन निर्णयानुसार ज्यांचे असे प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही त्यांचे मासिक निवृतीवेतन डिसेंबर (देय जानेवारी) पासून प्रणालीतून अपोआप बंद होणार आहे. त्यामुळे बँकेस विलंबाने दाखले जाणार नाही याची दक्षता घ्यावी .
जिल्हा कोषागार अधिकारी
कोषागार कार्यालय
परभणी
कोषागार कार्यालय
परभणी

![]() |
No comments:
Post a Comment