Monday, 20 July 2015

सुचना




सुचना

            सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, आपल्या कार्यालयातील डिसीपीएस योजनेत असलेल्या सर्व कर्मचा-यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत PRAN NO  देण्यात आलेला आहे. कर्मचा-यांची कपातीची रक्कम  त्यांना मिळालेल्या  PRAN NO. खाली जमा होणार आहे.  कोषागार कार्यालयातील डिसीपीएस शाखेत आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांचे  PRAN NO.   बाबतचा तपशिल आहरण व संवितरण  अधिकारी निहाय उपलब्ध आहे. आहरण व संवितरण अधिकारी  यांनी कोषागारात संपर्क साधून आपल्या कार्यालयातील कर्मचा-यांची PRAN NO. प्राप्त असलेली यादी तपासून यादीत नसलेल्या अधिकारी/ कर्मचा-याची माहीत               दि.22/07/2015 पर्यंत कोषागार कार्यालय परभणी येथे सोबत जोडलेल्या  नमुन्यात सादर करावी.


जिल्हा कोषागार अधिकारी
परभणी


राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील PRAN NO. बाबतचा तपशिल

आहरण व संवितरण अधिकारी साकेतांक
एकुण डिसीपीएस  कर्मचाऱ्यांची संख्या
PRAN NO. प्राप्त कर्मचाऱ्यांची संख्या
PRAN NO. अप्राप्त कर्मचाऱ्यांची संख्या
शेरा
1
2
3
4
5






                       


(स्वाक्षरी)
आहरण व संवितरण अधिकारी

Friday, 10 July 2015

DCPS कर्मचाऱ्यांचा Form 1 (For S 1 Preparation) ॲप्रुवल देण्याबाबत आहरण व संवितरण अधिकारी आणि कोषागारांनी करावयाची कार्यवाही

शासन निर्णय क्रमांक:अंनियो-2015/(NPS)/प्र.क्र.32/सेवा-4, दिनांक 06/04/2015 मधील अ.क्र. 16 मध्ये उल्लेख केल्यानुसार दिनांक 01/04/2015 पासून शासन सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवार्थ प्रणालीत भरल्यानंतर नमुना एस-1 ची माहिती कोषागार अधिकाऱ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि, निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाने (PFRDA) सद्यस्थितीतील नमुना एस-1 मध्ये बदल होणार असल्याचे कळविले असल्याने कोषागारांना तूर्त जुनाच नमुना म्हणजे   Form 1 दिसणार आहे. नजीकच्या कालावधीत बदल करण्यात आलेला नमुना एस 1 प्रणालीमध्ये विकसित करुन शासन निर्णयामध्ये नमुद केल्यानुसारच उपलब्ध होणार आहे.
याबाबत बऱ्याच कोषागारांनी DCPS कर्मचाऱ्यांचे फॉर्म अप्रुव्ह करण्याबाबत विचारणा केलेली होती. त्यानुसार सर्व कोषागारांनी DCPS कर्मचाऱ्याचा Form 1 अप्रुव्ह करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1.   आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या सहाय्यकाच्या लॉगीन मधून कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती भरणे
2.    सदर माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना Forward करणे
3.    आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहितीची तपासणी करुन फॉर्मची प्रिंट न घेता ऑनलाईन कोषागाराकडे फॉरवर्ड करणे.
4.   कोषागारातील सहाय्यकाने कोणत्याही हार्ड कॉपीची मागणी न करता ऑनलाईन प्राप्त झालेला अर्ज कोषागाराच्या लॉगीनमध्ये फॉरवर्ड करावयाचा आहे.
5. कोषागार अधिकाऱ्याच्या लॉगीनमध्ये माहिती तपासणी करताना त्याठिकाणी सद्यस्थितीतीलच Form 1 जनरेट झालेला दिसेल. सदर Form 1 च्या प्राथमिक माहितीनुसारच तद्नंतर Form S 1 तयार होणार असल्याने कोषागारांनी यावर ॲप्रुवल द्यावयाचे आहे.
6.    सदर ॲप्रुवल दिल्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना प्रणालीतून जनरेट झालेली DCPS Acknowledgement द्यावयाची आहे.
7.   सदर फॉर्म -1 ॲप्रुव्ह झाल्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या डिडीओ लॉगीनमध्ये उपलब्ध असलेल्या टॅबनुसार S 1 फॉर्म जनरेट होण्याकरीता आवश्यक असलेली माहिती अद्ययावत करावयाची आहे.
8.    उपरोक्‍त प्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर सदर S 1 फॉर्मची प्रिंट घेण्याबाबत उपलब्ध असलेल्या टॅबमधून प्रिंट घेण्यात यावी . दिनांक 01/04/2015 नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या फॉर्म S 1 वर  PRAN  क्रमांक नमूद होणार नाही.
                 9.    आहरण व संवितरण अधिकारी  सदर फॉर्मच्या 3 प्रती मुद्रीत करतील त्यापैकी 2 प्रती कोषागाराकडे सादर करतील, कोषागार अधिकारी त्यातील एक कार्यालयीन प्रत म्हणून जतन करुन एक प्रत NSDL कडे PRAN क्रमांक प्राप्त होण्यासाठी पाठवतील.

Wednesday, 1 July 2015

'ऑनलाईन हयात-प्रमाणपत्र' प्रायोगिक चाचणी यशस्वी



                    आज परभणी कोषागार येथे ऑनलाईन हयात प्रमाणपत्रसाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीपणे  पार पाडण्यात आली .

                    नियमित हयात प्रमाणपत्र बरोबर आधार linked  ऑनलाईन  हयातप्रमाणपत्र संल्कल्पना केंद्रीय कर्मचार्यांसाठी जीवन प्रमाण म्हणून राबविली जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. सेवानिवृत्त पेेंशनधारकांना दरवर्षी बँकेत जावून हयात असल्याचे प्रमाण द्यावे लागते. पेंशन देणाऱ्या एजन्सीला लिखित स्वरुपात पुरावे द्यावे लागतात. त्यानंतरच पेंशन विभाग सेवानिवृत्त लाभार्थ्यांच्या खात्यात पेंशन जमा करत असते. पेंशन धारकांना या सर्व असुविधांपासून मुक्त करण्यासाठी त्यांच्या पेंशन खात्यासोबत आधार क्रमांक जोडून बायोमेक्ट्रीक्स यंत्राद्वारे नोंद करण्यात येईल व लगेचच जीवन प्रमाणपत्र देण्यात येईल.

                       अशा प्रकारच्या हयात प्रमाणपत्राच्या धर्तीवर राज्यात सुद्धा  प्रकल्प राबविला जाणार आहे . संबंधित चाचणीसाठी परभणी जिल्हा कोषागारची दिनांक ०१/०७/२०१५ रोजीसाठी निवड करण्यात आली होती . या चाचणीत २९ निव्रीत्तीवेतनधारकाची यशस्वीपणे नोंद घेण्यात आली . सदर चाचणीच्या यशस्वितेसाठी परभणी जिल्हा सेवा निवृत्त संघटनेचे पुरेपूर सहकार्य लाभले.