Wednesday, 1 July 2015

'ऑनलाईन हयात-प्रमाणपत्र' प्रायोगिक चाचणी यशस्वी



                    आज परभणी कोषागार येथे ऑनलाईन हयात प्रमाणपत्रसाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वीपणे  पार पाडण्यात आली .

                    नियमित हयात प्रमाणपत्र बरोबर आधार linked  ऑनलाईन  हयातप्रमाणपत्र संल्कल्पना केंद्रीय कर्मचार्यांसाठी जीवन प्रमाण म्हणून राबविली जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. सेवानिवृत्त पेेंशनधारकांना दरवर्षी बँकेत जावून हयात असल्याचे प्रमाण द्यावे लागते. पेंशन देणाऱ्या एजन्सीला लिखित स्वरुपात पुरावे द्यावे लागतात. त्यानंतरच पेंशन विभाग सेवानिवृत्त लाभार्थ्यांच्या खात्यात पेंशन जमा करत असते. पेंशन धारकांना या सर्व असुविधांपासून मुक्त करण्यासाठी त्यांच्या पेंशन खात्यासोबत आधार क्रमांक जोडून बायोमेक्ट्रीक्स यंत्राद्वारे नोंद करण्यात येईल व लगेचच जीवन प्रमाणपत्र देण्यात येईल.

                       अशा प्रकारच्या हयात प्रमाणपत्राच्या धर्तीवर राज्यात सुद्धा  प्रकल्प राबविला जाणार आहे . संबंधित चाचणीसाठी परभणी जिल्हा कोषागारची दिनांक ०१/०७/२०१५ रोजीसाठी निवड करण्यात आली होती . या चाचणीत २९ निव्रीत्तीवेतनधारकाची यशस्वीपणे नोंद घेण्यात आली . सदर चाचणीच्या यशस्वितेसाठी परभणी जिल्हा सेवा निवृत्त संघटनेचे पुरेपूर सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment